भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे फेसबूक अकाऊंट हॅक; अज्ञाताकडून मसेज पाठवून पैशांची मागणी!
पिंपरी । प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे फेसबूक अकाऊंट अज्ञात इसमाने ‘हॅक’ केले आहे. याची माहिती आमदार जगताप यांनी ट्टिवटर अकाऊंटवरुन दिली आहे.
‘Laxmanjagatap Mla’ अशा नावो आमदार जगताप यांचे फेसबूक बनावट अकाऊंट होते. त्यावरुन येणाऱ्या वादग्रस्त पोस्टला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सध्या सामाजिक माध्यमांवर जनसामान्य नागरिकांसह राजकीय नेतेही मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. फेसबूक ट्टिवटर या माध्यमातून राजकीय नेते विविध माहिती आपल्या मतदारांना देत असतात. मात्र, हे सामाजिक माध्यम हॅक करुन त्याचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
माझ्या नावे Laxmanjagtap Mla या नावाने एका फेसबुक अकाऊंट हॅकरकडून हॅक करण्यात आलेले आहे. या अकाऊंटवरून वैयक्तिक मेसेज पाठवुन पैशाची मागणी किंवा इतर वस्तुंची मागणी करत आहे. फेसबुक अकाऊंटवरून अशा वादग्रस्त पोस्ट किंवा पैशांची मागणी करणे अशा पोस्टला कोणीही प्रतिसाद देवु देऊ नये. pic.twitter.com/VTU7bGQH7i
— Laxman Jagtap (@iLaxmanJagtap) July 18, 2021





