दिघी–बोपखेल परिसरात भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार!
मिशन- PCMC : उमेदवारांनी साधला मतदारांशी थेट संवाद

पिंपरी–चिंचवड: पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दिघी–बोपखेल–गणेशनगर परिसरात प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. श्रुती विकास डोळस, कृष्णा भिकाजी सुरकुले, हिरा नानी गोवर्धन घुले आणि उदय दत्तात्रय गायकवाड या उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत व्यापक प्रचार फेरी राबवली.

प्रचाराच्या दरम्यान तनिष होम सोसायटी, सुमन शिल्प, काटे वस्ती तसेच चौधरी पार्क लेन क्रमांक १ ते ४ मध्ये कोपरा सभा आयोजित केल्या गेल्या. प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उमेदवारांनी परिसरातील विकासकामे, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि युवकांसाठी संधी याबाबत आपले विचार मांडले. याशिवाय भारत माता नगर येथेही मतदारांच्या समस्या ऐकण्यासाठी सभा पार पडली.
हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरा सभांमध्ये दत्तात्रय परांडे, पंडित वाळके, विकास डोळस, कुलदीप परांडे, नामदेव रढे, रमेश विरणक आणि प्रमोद परदेशी यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सत्रात नवजीवन स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने राघव मंगल कार्यालय येथे आयोजित सभेत क्रीडा, युवक सक्षमीकरण आणि सामाजिक उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला.
भाजपाकडून वातावरण निर्मिती…
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यासाठी विनायक पार्क, विजय नगर आणि रुणवाल पार्कमध्ये दत्तात्रय आबा गायकवाड यांच्यासह उमेदवारांनी चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक सन्मान यासंदर्भात आश्वासने दिली गेली. एकूणच, दिघी–बोपखेल परिसरात झालेल्या विविध सभांमुळे भाजपच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून निवडणुकीचे वातावरण पक्षाच्या बाजूने जोर धरताना दिसत आहे.




