Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दुचाकीची ओम्नीला धडक; एकाचा मृत्यू

बावधन : एका मोपेड दुचाकीने ओम्नीला धडक दिली. त्यामध्ये ओम्नी गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १२ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता म्हाळुंगे येथे घडली.

अल्ताफ महिबूब शेख (वय २१, रा. म्हाळुंगे गाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सोहनलाल भकरराम देवासी (वय ३०, रा. म्हाळुंगे) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव उमेश टाक (वय १९, रा. म्हाळुंगे गाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड गुन्हेवृत्त: लेबर कॅम्प मध्ये कामगारांमध्ये हाणामारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहनलाल हे त्यांच्या भावाचे दुकान बंद करून दुकानातील सामान ठेवण्यासाठी ओम्नी गाडी घेऊन गेले होते. त्यावेळी प्रणव याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने ओम्नी गाडीला जोरात धडक दिली. यामध्ये प्रणव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या दुचाकीवरील सहप्रवासी अल्ताफ शेख याचा मृत्यू झाला. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button