ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

उपशिक्षक हनुमंत हुचगोळ यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’

शिक्षण विश्व: एम.एस.एस. हायस्कूलच्या कामगिरीमध्ये मानाचा तुरा

पिंपरी-चिंचवड | शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ध्येय एज्युकेशन फाउंडेशन (पाचगणी, जि. सातारा) यांच्या वतीने दिला जाणारा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ एम.एस.एस. हायस्कूल, श्रीधरनगर येथील उपशिक्षक हनुमंत देवराम हुचगोळ यांना जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुदाम विठ्ठल शेंडगे यांनी पत्राद्वारे त्यांच्या निवडीची घोषणा केली.

हनुमंत हुचगोळ यांना शिक्षण क्षेत्रात ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अध्यापनासोबतच ते उत्कृष्ट निवेदक, सूत्रसंचालक आणि ‘स्काऊट मास्टर’ म्हणूनही ओळखले जातात. विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी समाजकार्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हा पुरस्कार निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित ‘ध्येय एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२५’ या राज्यस्तरीय सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असून कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

हेही वाचा      :              ‘साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा’, उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश 

हुचगोळ यांना यापूर्वीही अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये भारत स्काऊट गाईड पुणे यांचा ‘दीर्घ सेवा पुरस्कार’, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’, मोरया शिक्षण संस्थेचा ‘अष्टपैलू पुरस्कार २०२६’ व ‘लक्षवेधी गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५’, तसेच ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाचा ‘उत्कृष्ट लेखन पुरस्कार २०२५’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार (२०१०) यांचा समावेश आहे.

या निवडीबद्दल मोरया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल शेंडगे, कार्यवाह तथा विश्वस्त प्राचार्या इंद्रायणी माटे-पिसोळकर, खजिनदार रणजीत सावंत तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हनुमंत हुचगोळ हे अत्यंत निष्ठावान, उपक्रमशील आणि बहुआयामी शिक्षक आहेत. त्यांच्या ३० वर्षांच्या सेवेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सामाजिक क्षेत्रातही मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मिळालेला हा पुरस्कार संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.

– इंद्रायणी माटे-पिसोळकर, प्राचार्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button