ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ऑटोमोबाइल म्युझियम उभारणार!

संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानासमोरील जागेवर होणार भव्य प्रकल्प

पिंपरी- चिंचवड : उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य ‘ऑटोमोबाइल म्युझियम’ उभारण्यात येणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानासमोरील मोकळ्या जागेत साकारला जाणार असून, यामुळे शहराच्या औद्योगिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

या म्युझियममध्ये शहरातील तसेच देशातील नामांकित ऑटोमोबाइल व औद्योगिक कंपन्यांना स्वतःचे दालन उभारण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारताच्या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या कार्याचा, दृष्टिकोनाचा आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाचा हा स्मरणीय ठेवा ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. उद्योग नगरीत सुनियोजित आणि प्रेरणादायी औद्योगिक स्मारक उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ऑटोमोबाइल क्षेत्राशी निगडित इतिहास, तंत्रज्ञान, संशोधन आणि भविष्यातील नव्या संकल्पना या म्युझियमच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडल्या जाणार आहेत.

या बैठकीत पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक व शहरी विकासाच्या दृष्टीने इतरही विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, रतन टाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात येणारे ऑटोमोबाइल म्युझियम हे शहरासाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल ठरेल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख केवळ औद्योगिक नगरी म्हणूनच नव्हे, तर औद्योगिक वारसा जपणारे शहर म्हणून अधिक बळकट होणार आहे.

“पिंपरी-चिंचवड ही देशातील महत्त्वाची औद्योगिक नगरी आहे. उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात येणारे ऑटोमोबाइल म्युझियम हा केवळ स्मारक प्रकल्प नसून, शहराच्या औद्योगिक इतिहासाचा आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा संगम असेल. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा, नियोजन आणि प्रशासकीय प्रक्रिया महापालिकेकडून प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. उद्योग, नवउद्योजक आणि नागरिकांसाठी हे म्युझियम प्रेरणास्थान ठरेल.”
– श्रावण हर्डिकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button