अमोल कोल्हेचा फेक नॅरेटिव्ह, विकी कौशलमुळं चव्हाट्यावर!

गेल्या काही दिवसात शंभूराजांच्या म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका साकारणारे दोन प्रमुख अभिनेते.. पहिले डॉ. अमोल कोल्हे आणि आत्ताच प्रदर्शित झालेला विकी कौशल चा छावा! अमोल कोल्हेची तुलना विकी कौशल च्या छाव्या बरोबर करायची झाली, तर विकीनं अमोलचं थोबाड फोडलं आहे, असंच म्हणावं लागेल.
राजकीय स्वार्थासाठी खोटा नॅरेटिव्ह
डॉ.अमोल कोल्हे हा कोणतीही राजकीय भूमिका नसलेला डबल ढोलकी नेता ! भाजपाने थारा दिला नाही म्हणून हळूच शरद पवारांच्या गोटात शिरलेला.. आणि टीव्हीच्या मालिकांमधून छत्रपती शिवाजी आणि शंभूराजांच्या भूमिका साकारून मिळालेल्या प्रसिद्धीच्या जोरावर स्वतःचा राजकीय स्वार्थ शोधून राजकीय दुकानदारी करणारा !
अमोल कोल्हे इतिहास माफ करणार नाही!
अमोल कोल्हे यांनी सोयीचे होईल तसेच छत्रपती शंभूराजेंचे चित्र दाखवले. त्यांनी मूळ इतिहासाची चिरफाड केली आणि जाती जातीत द्वेष पसरवून आपल्या राजकीय पक्षाला त्याचा फायदा कसा होईल, हेच पाहिले. स्वतःला तथाकथित हिंदू म्हणवून घेत अमोल कोल्हे यांनी आपल्या ‘नकली’ भूमिकांचा त्याचा राजकीय फायदयासाठी वापर करून घेतला.
छळ सोसला, हिंदुत्व सोडले नाही
क्रूरकर्मा औरंग्याने केलेले अत्याचार सहन केले, मात्र छत्रपती शंभूराजेंनी हिंदू धर्म सोडला नाही. परंतु अमोल कोल्हे यांनी स्वतःला हिंदुत्ववादी समजून त्याच हिंदू धर्मातील जाती-जातीमध्ये द्वेषभावना उत्पन्न केली. स्वतःच्या मतदारसंघांमध्ये मराठा विरुद्ध माळी समाज असा अघोषित संघर्ष पुकारून त्यांनी राजकीय पोतडी तर भरली, पण विजय मिळवून मतदार संघाशी प्रतारणा केली. निवडून आल्यानंतर मतदार संघाकडे पाठ फिरवून हिंदूंच्या समारंभांना अनुपस्थित राहण्याचे षडयंत्र रचले. अमोल कोल्हे हे कधी ‘नमाजवादी’ झाले, हे कळलेच नाही !
व्होट बँकेचे लांगुलचालन
अमोल कोल्हे यांनी कितीही इन्कार करू देत पण त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये व्होट बँकेचे लांगुलचालन केले. त्यासाठी वेळप्रसंगी हिंदुत्वाला तिलांजली दिली, तर कधी शिवरायांचा आणि शंभूराजांचा चुकीचा इतिहास मांडला, त्या आधारावरच विजय प्राप्त केला, हे आता प्रत्येक मतदार जाणतो आहे.
हेही वाचा – पुण्यात अवतरली शिवशाही : शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना
अमोल कोल्हे यांना एवढेच सांगावे वाटते, की तुमचा हा द्रोह संपूर्ण शंभूभक्त लक्षात ठेवतील आणि म्हणून इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही. राजकीय विजय हा तात्पुरता असतो, आणि पुढील निवडणुकीत हेच मतदार तुमचा वचपा काढतील, उट्टे काढतील याची खात्री आहे.
नेमकं काय दाखवलं आहे ‘छावा’ मध्ये
अलौकिक धाडस, शौर्य, निष्ठा, पराक्रम, अफाट ताकद, गनिमी काव्याच्या रूपानं दिलेला अतुलनीय लढा आणि शेवटी या संघर्षाची गद्दारीमुळं किंवा फितुरीमुळं झालेली शोकांतिका म्हणजेच सध्या गाजत असलेला शंभूराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावा ! हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणणारा छावा म्हणजेच पराक्रमी योद्धा शंभूराजा.. छत्रपती शिवाजी नावाचा सिंह होता, त्याचा शंभुराजा म्हणजेच संभाजीराजे नावाचा छावा होता, म्हणून हे हिंदवी स्वराज्य झाले.
लढवय्या मराठ्यांचा इतिहास.. क्रूरकर्मा औरंग्याचा इतिहास पाहायचा असेल तर या चित्रपटातून अनुभवता येईल. अमोल कोल्हे यांच्या टीव्हीवरच्या मालिका पाहून आता उशिरा का होईना पण चीड येऊ लागली आहे, त्यांनी पूर्णपणे खोटा इतिहास सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
विश्वासघात पाहवत नाही
औरंग्याच्या क्रूर वागण्यानं, त्याच्या विश्वासघातानं आपलं रक्त सळसळावं, अशी ही छावाची थीम.. संपूर्ण इतिहास हा रक्तरंजितच होता आणि तो तसाच दाखवला गेला, हे जास्त महत्त्वाचं. आपल्या राजाचं व्यक्तिमत्त्व हे एका सिंहाला मागं टाकेल याच स्वरुपाचं होतं आणि शंभूराजांची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या विकी कौशलनं पडद्यावर ते त्याच प्रकारे सादर केलेलं आहे. तो आवेश, ती मुद्रा, तो संताप आणि प्रसंगी तो हळवेपणा.. सगळं सगळं त्यानं अगदी मनोभावे आणि हृदयापासून उत्तमरीत्या साकारलंय..
पुढील पिढीसाठी राजांचा इतिहास महत्त्वाचा
शंभूराजे पुढील पिढीच्या लक्षात राहतील, याची संपूर्ण तजवीज त्यानं करून ठेवली आहे. अगदी सुरुवातीला बुऱ्हाणपूरच्या लढाईत महाराज एका लहान मुलाला वाचवून त्याच्या आईच्या स्वाधीन करतात असा एक भावनिक प्रसंग आहे. हा ज्याप्रकारे विकी कौशलनं साकारलाय,ते पाहून महाराणी सईबाई आणि शंभूराजे यांच्या नात्यातला तो ओलावा आपल्याला सहज भावनिक करून टाकतो, अचूकपणे हळवेपणा टिपला गेला आहे.
मराठी कलाकारांच्या योग्य भूमिका
रश्मीका स्वराज्याची महाराणी म्हणून अगदी ठसठशीत उठून दिसली आहे. तिचे दागिने, साड्यांची स्टाईल, मोठाले पाणीदार डोळे मोठ्या पडद्यावर बघताना नकळत आपण येसूबाईंना सुद्धा एक मुजरा करतो. आपल्या मराठी कलाकारांनी त्यांची त्यांची पात्रे यशस्वीपणे पार पाडलेली आहेत. तीन तासांच्या चित्रपटात जितकं काम त्यांना मिळालं, तितकं त्यांनी चोख बजावलं आहे. संधीचं सोनं केलं आहे.
कवी कलश आवर्जून लक्षात राहतात. बॉलीवूड चित्रपट म्हटला की त्याची तुलना ही भव्य दिव्य अशा चित्रपटांशी होणारच. आनंद या गोष्टीचा वाटतो की ‘छावा’ सुद्धा या तुलनेत कुठच कमी पडलेला नाही. भव्य-दिव्य सेट्स, कलाकारांचे गेट अप ते व्हीएफएक्स एफेक्ट्स हे सगळं अगदी उत्तमपणे जुळून आलेलं आहे.
क्रूरकर्मा औरंग्या, आणि त्याची औलाद
शंभूराजे पकडले गेले तेव्हापासून पुढचा चित्रपट हळव्या मनाच्या रसिकांना नक्कीच भावणार नाही. त्यांचा संताप होईल. वेळप्रसंगी तीळपापड देखील होईल. क्रूरकर्म्या औरंग्याचे विकृत आणि विक्षिप्त आदेश, त्यानुरूप साखळदंडानं बांधून ठेवलेल्या शंभुराजाचा सुरू असलेला छळ अजिबात बघवत नाही. पण, थिएटर मधून बाहेर पडणाऱ्या लोकांचे ओले झालेले डोळे, हमसून हमसून दिल्या जाणाऱ्या हुंदक्यांचे आवाज आणि एक भयाण शांतता ही शेवट कशाप्रकारे दाखवला गेलाय आणि त्याचा किती परिणाम झालाय, हे समजण्यासाठी पुरेसं आहे.
विकी कौशलने त्याच्या मेहनतीच्या जोरावर रणवीर सिंगचा बाजीराव आणि गश्मिरने साकारलेले शंभूराजे हे काहीकाळ विस्मरणात नक्कीच घालवले आहेत. हा सहज सुंदर, धाडसी आणि मराठमोळ्या संस्कृतीची महती सांगणारा सिनेमा आहे. मुख्य म्हणजे विकी कौशल्य साकारलेल्या संभाजीमुळे अमोल कोल्हे यांचा संभाजी, आणि त्यांचा नकली चेहरा उघडा पडला आहे. अमोल कोल्हे यांनी शंभुराजांवरची मालिका साकारली होती, विकी कौशल्य केवळ तीन तासाच्या सिनेमात त्यांचे ‘फेक नॅरेटिव्ह’ चव्हाट्यावर आणले आहेत, खऱ्या अर्थाने हा अमोल कोल्हे यांचा आज पराभव म्हणावा लागेल, हे नक्की!