Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राखीव जागेसाठी चऱ्होली ग्रामस्थांचा एकमताचा निर्णय

चऱ्होली प्रभाग ३ मधून ‘एक गाव, एक उमेदवार’चा ठाम निर्धार

विकासात्मक विचारधारेमुळे प्रचारात सकारात्मक वातावरण

पिंपरी | चऱ्होली येथील प्रभाग क्रमांक ३ मधील (अ) अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी ग्रामस्थांनी ‘एक गाव, एक उमेदवार’ या तत्त्वावर एकमताने निर्णय घेतला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मतभेद बाजूला ठेवत एकसंघपणे पुढे जाण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

या निर्णयामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट तसेच तरुण वर्ग यांचा सक्रिय सहभाग होता. एकमताने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रभागात ऐक्याचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विकासाच्या दृष्टीने एकसंघ नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे.

प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधताना विकासकामे, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सामाजिक सलोखा या मुद्द्यांवर भर दिला जात आहे. या विकासाभिमुख भूमिकेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा      :          चाकण–तळेगाव महामार्गावर भीषण अपघात

विशेषतः महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच व्यापारी वर्गानेही पारदर्शक व विकासकेंद्रित कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला आहे.

नागरिकांकडून विकासाची ग्वाही..

सध्या प्रचारात ‘एक गाव, एक उमेदवार’ या संकल्पनेमुळे मतांचे विभाजन टळणार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. ग्रामस्थांनी एकमताने घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत एकसंघ मतदान होऊन प्रभागाच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button