Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळेगाव दाभाडे येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

गुन्हेवृत्त : जुना पुणे-मुंबई मार्गावरील घटना

तळेगाव दाभाडे : सोमाटणे फाटा येथील जुना पुणे–मुंबई महामार्गावर शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कंटेनर चालकास अटक करण्यात आली आहे.

मयताचे नाव बाबासाहेब रामभाऊ जाधव (वय ५३) असे असून ते बाजारासाठी घरातून दुचाकी (टीव्हीएस इंटोर्क, क्रमांक MH12RW1330) घेऊन निघाले होते. दुपारी सुमारे १२.१० वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर आरोपी चालक लाल शेखर यादव (रा. इसापूर, आझमगड, उत्तर प्रदेश) याने चालविलेल्या टाटा कंटेनर (क्रमांक NL01AJ1700) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेनंतर जाधव हे दुचाकीसह खाली पडले असून कंटेनर त्यांच्या पोटावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

हेही वाचा – भोसरीत चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अपघातानंतर जाधव यांना तातडीने पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद रोहित हनुमंत बजगडे (वय २९, रा. तळेगाव दाभाडे) यांनी दिली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुल्ला करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button