मिशन-PCMC: मोशी प्रभागात आमदार महेशदादा लांडगे यांची भव्य पदयात्रा
माजी महापौर राहुल जाधव यांच्या नेतृत्त्वात भाजपाच्या पॅनेलचा प्रचार आघाडीवर!

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दि. 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा वूड्सविले फेज टू, लक्ष्मी चौक येथून सुरू होऊन स्वराज रेसिडेन्सी ते प्रेस्टिंग ग्रीन सोसायटी फेज 1, 2 व 3 मार्गे स्वदेशा सोसायटी, श्रीरामचौक व रिव्हर परिसरातून मार्गक्रमण करणार आहे.
प्रभाग क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या मोशी, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी व चिखली परिसरात ही पदयात्रा काढण्यात येणार असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे. भारतीय जनता पार्टीकडून या प्रभागात सुजाता निलेश बोराटे (अ – ओबीसी महिला), सारिका नितिन बोऱ्हाडे (ब – सर्वसाधारण महिला), राहुल गुलाब जाधव (क – सर्वसाधारण) आणि निखिल शिवाजी बोऱ्हाडे (ड – सर्वसाधारण) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

हेही वाचा : अपक्ष ठरवलेल्या जयश्री भोंडवेंना अखेर राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ चिन्ह
पदयात्रेदरम्यान प्रभागाच्या विकासाचा आढावा घेत “प्रभाग क्रमांक 2 मध्ये आता फक्त कमळच” तसेच “प्रभाग 2 च्या प्रगतीला चारही मते भाजपला” अशा घोषणा देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. ‘कमळ’ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येणार आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान गुरुवार, दि. 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे प्रचार कार्यक्रम वेग घेत असून प्रभाग क्रमांक 2 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.
प्रभाग क्रमांक २ मधील मोशी, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी आणि चिखली परिसराचा सर्वांगीण विकास हेच आमच्या पॅनेलचे प्रमुख ध्येय आहे. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला व युवक सक्षमीकरण यांसह मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान कारभार करण्याचा आम्ही ठाम निर्धार केला आहे. नागरिकांच्या प्रत्येक समस्या ऐकून वेळेत आणि गुणवत्तापूर्ण उपाययोजना राबवणे, विकासकामांमध्ये कोणताही भेदभाव न ठेवता सर्व घटकांना न्याय देणे आणि प्रभागाला आदर्श बनवणे हेच आमचे वचन आहे. ‘चारही मते भाजपला’ देऊन आमच्या पॅनेलला संधी दिल्यास, प्रभाग क्रमांक २ मध्ये विकासाचा नवा अध्याय निश्चितच सुरू होईल.
– राहुल जाधव, माजी महापौर, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 2 मोशी.




