ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अपक्ष ठरवलेल्या जयश्री भोंडवेंना अखेर राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ चिन्ह

पिंपरी | निवडणूक अर्ज छाननीमध्ये तांत्रिक कारणास्तव अपक्ष ठरवण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार जयश्री भोंडवे यांना अखेर पक्षाचं अधिकृत ‘घड्याळ’ चिन्ह मिळालं आहे. एबी फॉर्म वेळेत सादर करूनही तो प्रशासकीय स्तरावर गहाळ झाल्याने निर्माण झालेला पेच उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर सुटला.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक १६ (मामुर्डी–किवळे–रावेत) येथील ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला) जागेसाठी जयश्री भोंडवे यांनी आपला उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा एबी फॉर्म नियमानुसार वेळेत सादर केला होता. मात्र, अर्ज छाननीच्या दिवशी एबी फॉर्म उपलब्ध नसल्याचे कारण देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केले. या निर्णयामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

हेही वाचा      :            उमर खालीद आणि शर्जीलला जामीन नाहीच; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय 

आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात भोंडवे यांनी तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. अर्ज सादर करतानाचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी आणि अन्य तांत्रिक पुरावे त्यांनी न्यायालयासमोर मांडले. सादर पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्याने न्यायालयाने निवडणूक आयोगाला या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या आदेशानुसार, पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीची सुनावणी घेतली. सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांची सखोल पडताळणी केल्यानंतर जयश्री भोंडवे यांनी एबी फॉर्म विहित मुदतीतच सादर केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर छाननीतील त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले.

या निर्णयामुळे चिन्ह वाटपाच्या अंतिम यादीत जयश्री भोंडवे यांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून करण्यात आला आणि त्यांना पक्षाचं ‘घड्याळ’ चिन्ह बहाल करण्यात आलं. या नाट्यमय घडामोडींनंतर भोंडवे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणूक प्रचाराला नव्या जोमाने सुरुवात झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button