ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सिम कार्ड बंद होणार असल्याचे सांगून 65 वर्षीय महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक

पुणे | अनोळखी इसमाने मोबाईलवर फोन करून तुमचे सिम कार्ड बंद होणार असल्याचे सांगून 65 वर्षीय महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 9 जून ते 3 ऑगस्ट 2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने हा प्रकार घडला.

याप्रकरणी एरंडवणे येथील 65 वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल धारक, बँक खातेधारक यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेल्या अज्ञात इसमाचा फोन आला. त्याने मी कस्टमर केअरमधून बोलत आहे असून तुमचे सिमकार्ड बंद होणार आहे, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने महिलेला बँकेच्या खात्यावर 10 रूपयांची एनईएफटी करण्यास सांगितले व फिर्यादी यांच्या नकळत 5 लाखा 52 हजार 30 रूपये काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button