पिंपरी / चिंचवड

रिक्षा प्रवासादरम्यान 93 हजारांच्या दागिन्यांची चोरी : सहप्रवासी महिलांवर संशय

पिंपरी l प्रतिनिधी

रिक्षातून प्रवास करत असलेल्या महिलेसोबत प्रवास करून तीन अनोळखी महिलांनी महिलेच्या नकळत पर्समधून 3 हजारांचे दागिने चोरून नेले हा प्रकार शुक्रवारी (दि. 22) दुपारी पावणे पाच वाजता तळेगाव-चाकण रोडवर इंद्रायणी कॉलेज समोरील बस थांबा ते स्टेशन चौक या दरम्यान घडला.

जयश्री जयवंत शिगवणकर (वय 52, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी दुपारी पावणे पाच वाजता तळेगाव चाकण रोडवरील इंद्रायणी कॉलेज समोरील बस थांबा ते तळेगाव स्टेशन चौक या दरम्यान रिक्षातून प्रवास करत होत्या. त्यावेळी तीन महिला फिर्यादीच्या रिक्षात बसल्या. त्या तीन महिलांनी फिर्यादीच्या नकळत त्यांच्या पर्समधून 43 ग्राम वजनाचे 93 हजारांचे सोन्याचे दागिने हातचलाखी करून चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button