आरोग्य तपासणी शिबिरात ५० पोलिसांचा सहभाग
रावेत पोलीस स्टेशन येथे १०६ वे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पिंपरी | प्रतिनिधी
रावेत पोलीस स्टेशन येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. माऊली क्लिनिक, एफपीए, पीसीसीए, आदित्य बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने. ‘१०६ वे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिरात 50 पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये मोफत हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, अस्थिरोग, त्वचा संबंधित तपासणी व उपचार करण्यात आले. त्याबरोबर रावेत पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे रक्त तपासणी यामध्ये सीबीसी, ब्लड ग्रुप, ईसीजी आदींसह विविध तपासणी करण्यात आली. पोलीसांना निरोगी आरोग्य आणि सशक्त जीवन जगता यावे म्हणून अशा प्रकारचे आरोग्य शिबीर सातत्याने आयोजीत करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हेही वाचा – ‘खासदाराविना मतदारसंघ’ अशी शिरूरची ओळख, कामे कशी होणार? आढळराव पाटील
डॉ. किरण जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैदयकीय सेवा करत असतांना अशी शिबिरे आयोजित केली आहेत. समाजाचे ऋण फेडण्यासाठी अनाथाश्रम, विदयार्थी, सेवेकरी- वारकरी, साधु-संत पोलीस आदींसाठी १०५ मोफत आरोग्य शिबीर घेतले आहे. या सेवेसाठी डॉक्टर किरण जोशी यांना राज्यभरातील अनेक सेवाभावी संस्था संघटना यांनी विविध प्रकारचे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
रावेत पोलीस स्टेशन येथील शिबीरासाठी डॉ. किरण जोशी, डॉ. शशिकांत व्यवहारे, डॉ. खानापुरकर, डॉ. अजित पाटील, डॉ. कैलास जोरुले यांनी तपासणी व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन मिलींद जोशी, रविंद्र पवार, सूरज पांढरे, योगेश सातपुते, मुक्ता नवानी,रोहिणी जोशी, नेहा जोशी, सुरज भंडारे, संजय मोरे यांनी केले होते. एपीआय राहुल कुंभार यांनी आभार मानले. या उपक्रमाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम, पोलीस निरीक्षक राहुल कुंभार, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चाटे यांनी कौतुक केले.