स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा, पाकव्याप्त काश्मीर लटकला!

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना दुसरीकडे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. बलोच नेता मीर यार बलोच याने ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ ची घोषणा करत पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली.
पाकव्याप्त काश्मीरवर ताबा घ्या !
साहजिकच प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येतो की आता पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यातून आपण काढून घेणार का ? खचलेल्या पाकिस्तानवर दबाव आणून पाकव्याप्त काश्मीर आपण मुक्त करू शकणार नाही का? आणि प्रत्येक जण हेच म्हणत आहे की हीच वेळ आहे, पाक व्याप्त काश्मीरवर ताबा घेण्याची !
कोण हा मीर यार बलोच ?
मीर यार बलोच हा एक लेखक आणि स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मीचा नेता आहे. त्याने पाकिस्तानपासून बलुचिस्तान स्वातंत्र झाल्याचे घोषित केले. नवी दिल्लीमध्ये बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्त सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्याने भारताकडे केली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनी त्यांची शांती सेना ही बलुचिस्तानमध्ये पाठवावी आणि पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या सीमेत पाठवावे, अशी मागणीही त्याने केली आहे.
प्रश्न पाकव्याप्त काश्मीरचा..
भारताचे नौदल, लष्कर आणि हवाई दल हे सर्व शत्रूला धडा शिकवण्यात गुंतलेले आहेत. दरम्यान, भारतीय सैन्याच्या हल्ल्याने बिथरलेल्या पाकड्यांच्या तावडीतून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा आणि ते आपल्या ताब्यात घेण्याची हीच वेळ आहे, असे देशातील सर्व नागरिक एक सुरात म्हणत आहेत. त्यात पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके हा भारताचा एक भाग आहे, ज्यावर पाकिस्तान जबरदस्तीने आपला दावा करत आहे, असा ही सूर सर्वत्र उमटला असताना युद्धाशिवाय पीओके परत घेता येणे शक्य आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा- निमगाव भोगीत प्रदूषणाचा विळखा: ग्रामस्थांची शरद पवार, उदय सामंत यांच्याकडे न्यायाची मागणी
पीओके ची दोन भागात विभागणी..
पीओके दोन भागात विभागला गेला आहे. त्यातील एक भाग गिलगिट आणि बाल्टिस्तान म्हणून ओळखला जातो. हा भूभाग ६४ हजार ८१७ किलोमीटर चौरस क्षेत्रावर पसरलेले आहे.. दुसरा भाग पीओकेचा आहे जो १३ हजार २९७ किलोमीटर चौरस क्षेत्रावर पसरला आहे. जेव्हा देश स्वतंत्र नव्हता, तेव्हा जम्मू आणि काश्मीरचा राजा हरीसिंह यांच्या ताब्यात हा भाग होता. जास्त करांमुळे मुस्लिमांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. त्या वेळी, राजा आणि प्रजा यांच्यातील संघर्षाचे एक प्रमुख कारण होते. कालांतराने जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा पाकिस्तानी लोकांना वाटले की काश्मीर त्यांचेच आहे.
पाकिस्तानने कसा ताबा ठोकला ?
जेव्हा काश्मीरमध्ये विरोध वाढला आणि अनेकांनी तेथे प्रवेश केला, तेव्हा राजा हरीसिंह घाबरले आणि सरदार पटेल यांच्याकडे गेले. सरदार पटेल म्हणाले की, आमच्या सोबत या. आम्ही सैन्य पाठवू आणि पाकिस्तानींना हाकलून लावू. या प्रस्तावानंतर, राजा हरीसिंह यांनी ‘इंस्ट्रूमेंट ऑफ एक्सेशन’ या करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर भारतीय सैन्याला पाकिस्तानातील लोकांना जम्मू आणि काश्मीरच्या सीमेपार हलवण्यात यश आले. तोपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू संयुक्त राष्ट्रांमध्ये पोहोचले होते. तेथे एक ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामध्ये असे म्हटले होते, की प्रत्येकाने जिथे आहात तिथेच राहावे. पाकिस्तानने यावर सहमती दर्शवली होती, परंतु भारताने एक अट घातली, की जोपर्यंत पाकिस्तानी भारतीय भूमी सोडत नाहीत तोपर्यंत लोकांचे मत घेतले जाणार नाही.
युद्धाशिवाय आता कोणता पर्याय?
भारत पीओके थेट परत घेऊ शकत नाही. कारण, हा एक गुंतागुंतीचा आंतरराष्ट्रीय वाद आहे, जो केवळ बळाच्या जोरावर सोडवता येत नाही. पीओके हा भारताचा अविभाज्य भाग आहे, परंतु पाकिस्तान तो आपल्या नियंत्रणाखाली ठेवतो. पीओके परत मिळवण्यासाठी युद्ध हा एकमेव पर्याय आहे. पण त्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होईल. पीओकेच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र संघ मध्यस्थीची भूमिका बजावते.
युद्ध शेवटचा मार्ग..
भारत आणि पाकिस्तानमधील हा प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. पीओके पाकिस्तानच्या ताब्यात आहे, त्यामुळे ते परत मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे युद्ध. पाकिस्तानने स्वतः परत केले तरच युद्धाशिवाय पीओके परत मिळवता येईल आणि पाकिस्तान कधीही ते करणार नाही. म्हणून युद्ध हाच एकमेव पर्याय आहे, असे वाटते. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सर्व सहकारी अत्यंत तल्लख बुद्धीचे आणि चाणाक्ष आहेत. पाकव्याप्त काश्मीर वर आज ना उद्या ते तोडगा काढणारच याची प्रत्येक भारतीयाला खात्री आहे. पाकव्याप्त काश्मीर हे भारताचे एक अंग होणार आहे, प्रश्न एवढाच आहे की कधी ? आणि या कधीचे उत्तर मिळत नाही, हे आपले दुर्दैव आहे !