Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पिंपरीतील ३२ पर्यटक सुरक्षित!

शहरातील युवा सेना शहर प्रमुखाने सांगितली ''आपबीती'

पिंपरी चिंचवड :  जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील ३२ पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले
आहेत, मात्र ते सध्या सुरक्षित आहेत. रावेत, चिंचवड, भोसरी परिसरातील हे रहिवासी आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा यातील एका युवकाशी संपर्क झाला. त्यांना मदत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जण मृत्युमुखी पडले. जम्मू काश्मीरमध्ये पिंपरी-चिंचवड मधील ३२ जण अडकले आहेत. या पर्यटकांनी १३ एप्रिलला सहलीला सुरुवात केली होती. अनेक ठिकाणे पाहिली, शेवटचे ठिकाण पहलगाम होते. हे 32 पर्यटक पहलगाम मध्ये रात्री अडकले सकाळी तिथून बाहेर पडलो. सहलीला आलेल्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यातील काही जणांना आरोग्याचा त्रास होत आहे. त्यांच्यासाठी दोन खासगी बस थांबवण्यात आल्या आहेत. आम्हाला मदत मिळाल्यास बरे होईल असे पर्यटकांनी म्हटले आहे. याबाबत अण्णा बनसोडे म्हणाले, पिंपरी-चिंंचवड मधील ३२ जण पर्यटक पहलगाममध्ये अडकून पडले आहेत. यातील दिनेश पाटील या युवकाशी माझी चर्चा झाली. नंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जेष्ठ नागरिक, महिला, लहान
मुले यांचा समावेश आहे. इथे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप पिंपरी-चिंचवड मध्ये कसे आणता येईल याबाबत योग्य ती पावले उचलण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली आहे..

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

पहलगाम येथे दहशतवादी भ्याड हल्ला झाल्याचे कळाले आणि काही क्षण अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. हल्ला झालेल्या बैसरन व्हॅली ज्याला मिनी स्विझर्लंड संबोधले जाते. तेथे आदल्याच दिवशी आम्ही सहकुटुंब गेलो होतो. या घटनेनंतर आमच्या सोबत असलेले पर्यटक आम्ही सर्वच भयभीत आहोत. सध्या आम्ही श्रीनगर येथे आहोत आमच्या सोबत इतरही ठिकाणाहून आलेले पर्यटक आहेत. सैन्य दलाने आता हा सर्व परिसर ताब्यात जरी घेतला असला तरी प्रत्येकाच्या मनातील भीती मात्र तशीच आहे. यानंतर आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडून संपर्क केला जात आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आणि आमदार सचिन अहिर यांनी फोन द्वारे प्रत्येकाशी संपर्क साधून मदत केली आहे. सैन्यमार्फत प्रत्येकाला सुरक्षित रित्या एअरपोर्ट पर्यंत पोहोचवले जात आहे. दोन ते तीन दिवसात येथील अडकलेला प्रत्येक प्रवासी सुखरूप आपल्या घरी परतणार आहे याची खात्री आहे.

– चेतन पवार,युवासेना शहर प्रमुख,शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

पिंपरी – चिंचवडमधील काही पर्यटक अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून संपर्क साधला आहे. समन्वय अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button