Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय…

Maharashtra Cabinet Decision : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या सक्षमीकरणापासून ते आरोग्य विभागातील आरोग्य सेविकांच्या नियुक्त्यांबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्याय आणि सेवानिवृत्त बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलायं. त्यामुळे आता आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आरोग्यसेविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा –  काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ दिग्गजांचा समावेश…

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतल महत्वाचे निर्णय..

-ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग)

-राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)

-धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग)

-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार. (नगर विकास विभाग)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button