देशात 3.33 लाख ॲक्टिव्ह रुग्ण, 24 तासांत 25,072 नवे रुग्ण
पुणे | भारतात गेल्या 24 तासांत 25 हजार 072 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 389 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 3 लाख 33 हजार 924 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेतआरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 24 लाख 49 हजार 306 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 16 लाख 80 हजार 626 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 44 हजार 157 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात 389 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून, भारतात आजवर 4 लाख 34 हजार 756 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 97.60 टक्के एवढा आहे.आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 50 कोटी 75 लाख 51 हजार 399 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 12 लाख 95 हजार 160 नमूने तपासण्यात आले आहेत.
लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 58 कोटी 25 लाख 49 हजार 595 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत 7 लाख 95 हजार 543 जणांना लस टोचण्यात आली आहे.





