Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणलोट क्षेत्रात संततधार.. पवना धरणातून ४०० क्युसेक्सने विसर्ग सुरू

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी  : लोणावळा मावळ परिसरात पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस चालू आहे. धरण सध्या ७२ टक्के भरले असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. तरी, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज (दि.०५) दुपारी १२ वाजल्यापासून सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने मुक्त विसर्ग करण्यात आला आहे. प्रथम सांडव्यावरील विसर्ग ४०० क्युसेक्स इतका राहणार असून, सदरील विसर्ग हा दि.१५ जुलै पर्यंत चालू राहणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे अशी‌ माहिती पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने म्हटले आहे की, पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये ७२ टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे.

हेही वाचा – ठाकरे बंधू एकत्र येताच महाविकासआघाडीत फूट! विजयी मेळाव्याला काँग्रेसची दांडी

तरी, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज (दि.०५) दुपारी १२ वाजल्यापासून सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने मुक्त विसर्ग करण्यात येणार आहे. प्रथम सांडव्यावरील विसर्ग ४०० क्युसेक्स इतका राहणार असून, सदरील विसर्ग हा दि.१५ जुलै पर्यंत चालू राहणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे.

तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कृपया कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button