Breaking-newsपिंपरी / चिंचवड

सार्वजनिक जीवनांशी निगडीत बाबींवर प्रकाश टाकणारे 2019-20 चे अंदाजपत्रक स्थायीला सादर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शास्वत वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, राहणीमान, कायदा व सुव्यवस्था, माहिती तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास या प्रमुख बाबींवर प्रकाश टाकणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2019-20 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी स्थायी समितीला आज सादर केले. 2019-20 चे मूळ 4 हजार 620 कोटी तर जेएनएनयूआरएम योजनेसह 6 हजार 183 कोटी रुपयांचे अंदाज पत्रक सादर करण्यात आले आहे.

स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये आज महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 37 वा अर्थसंकल्प सादर केला.

 अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

पाणीपुरवठा योजनेसाठी 87.50 कोटी, पीएमपीएमएल 190.82 कोटी, नगररचना भू संपादन करण्यासाठी 140 कोटी, अतिक्रमण निर्मूलन कार्यवाहीसाठी 2.30 कोटी, स्वच्छ भारत मिशन 10.38 कोटी, स्मार्ट सिटी 150 कोटी, प्रधानमंत्री आवास योजना 36.39 कोटी, अमृत योजना 72.50 कोटी, नदीसुधार प्रकल्प 200 कोटी, मनपाच्या विकासकामासाठी 1363.74 कोटी रकमेची भरीव तरतूद केली आहे.

क्षेत्रीय स्तरावर विकासकामांची तरतूद

अ क्षेत्रीय कार्यालय 45.23 कोटी, ब क्षेत्रीय कार्यालय 20.41 कोटी, क क्षेत्रीय कार्यालय 33.91 कोटी, ड क्षेत्रीय कार्यालय 17.51 कोटी, इ क्षेत्रीय कार्यालय 26.50 कोटी, फ क्षेत्रीय कार्यालय 31.95 कोटी, ग क्षेत्रीय कार्यालय 20.27 कोटी, ह क्षेत्रीय कार्यालय 43.24 कोटी.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button