Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

साने चौक ते भोसरी दरम्यान बससेवा सुरु करा- स्वीकृत सदस्य दिनेश यादव

पिंपरी: चिखली साने चौक येथून जय गणेश साम्राज्य मार्गे भोसरी या मार्गावर पीएमपीएमएलची बस सेवा सुरु करण्याची मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे केलेली आहे. याबाबत यादव यांनी पीएमपीच्या पिंपरी चिंचवडचे व्यवस्थापक संतोष माने यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलेले आहे. चिखली येथून भोसरी तसेच पुणे नाशिक महामार्ग व स्पाईन रोड परिसर नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

मात्र, चिखली साने चौक येथून पुणे नाशिक महामार्ग, जय गणेश साम्राज्य आणि भोसरी येथे जाण्यासही पीएमपीएलची बससेवा उपलब्ध नसल्याने नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होते. त्यांना थरमॅक्स चौक येथून बस पकडावी लागते. त्यामुळे वेळ आणि पैसाही जादा खर्च करावा लागतो. त्यामुळे चिखली साने चौक येथून जय गणेश साम्राज्य मार्गे भोसरी या मार्गावर पीएमपीएमएलची बस सेवा सुरु करावी. या बससेवेचा सानेचौक, मोरेवस्ती, घरकुल, हरगुडे वस्ती, पवारवस्ती, सेक्टर १६, सेक्टर १३, संतनगर या भागातील नोकरदार आणि अन्य प्रवाशांना होईल, असे दिनेश यादव यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button