Donald Trump | ‘भारतात आयफोन बनवू नका’; डोनाल्ड ट्रम्प यांचा अॅपलला इशारा

Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारची राजधानी दोहा येथील एका व्यावसायिक कार्यक्रमात मोठे विधान केले आहे. त्यांनी अॅपल कंपनीला भारतात आयफोनचे उत्पादन न करण्याचे आवाहन केले आहे. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले की, भारताला स्वतःचे हितसंबंध सांभाळू द्यावे आणि अॅपलने अमेरिकेत उत्पादन वाढवावे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी काल टिम कुक यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हणालो, टिम, आम्ही तुमच्याशी खूप चांगले वागतोय. तुम्ही ५०० अब्ज डॉलर्सची कंपनी बांधत आहात, पण आता मी ऐकत आहे की तुम्ही भारतात कारखाने बांधत आहात. मला असे वाटते की भारतात कारखाने उभारावे. जर तुम्हाला भारताला मदत करायची असेल तर ते ठीक आहे, पण भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. तिथे विक्री करणे कठीण आहे. भारताने आम्हाला एक प्रस्ताव दिला आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या वस्तूंवर कोणताही कर लादणार नाही असे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा : ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का?’ प्रकाश महाजन म्हणाले; “संजय राऊत…”
ट्रम्प यांनी अॅपलच्या भारतातील उत्पादन योजनांवर आक्षेप घेताना म्हटले, तुम्ही आधी चीनमध्ये कारखाने बांधले, ते आम्ही वर्षानुवर्षे सहन केले. आता आम्हाला तुम्ही भारतात कारखाने बांधावेत असे वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ते खूप चांगले काम करत आहेत. आम्हाला तुम्ही अमेरिकेत कारखाने उभारावेत असे वाटते.