संभाजीनगर महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी अॅड. अंजली पानसरे-साबळे यांची निवड

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – अॅड अंजली साईनाथ पानसरे-साबळे यांची शिवशाही व्यापारी संघाच्या संभाजीनगर (औरांगाबाद) जिल्हा महीला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सिंचन शासकीय विश्रामगृह संभाजीनगर औरांगाबाद याठिकाणी शिवशाही व्यापारी संघाची बैठक पार पडली. या बैठकीत अॅड अंजली पानसरे-साबळे यांच्या निवडीची घोषना प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली.
यावेळी प्रदेश सचिव गणेश आहेर, रविकिरण घटकार, शिवशाही व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, पूर्वअध्यक्ष बबलु वाणे, मारूती मस्के, आंजली पाणसरे, राजन उबाळे, शिवकन्या साबळे, सागर बनसोडे, आनंद मस्के आदी उपस्थित होते.
या बैठकीत शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी जिल्ह्यातील व्यापारी वर्गाचे तसेच सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी काम केले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी ते अतोनात कष्ट उपसत आहेत.





