शहरात १ हजार ११६ जणांना ‘होम इन क्वारंटाईन’च्या सूचना, तर नियम मोडणाऱ्या १४ जणांना पालिकेची नोटीस

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणू पसरत चालला असला तरी गेल्या दोन दिवसांत एकही संशयित आढळला नाही. ही आनंदाची बाब असली तरी आजअखेर १ हजार ११६ जणांना १४ दिवसांसाठी “होम इन क्वारंटाईन”च्या सूचना दिल्या आहेत. अशा सूचना असुनही घराबाहेर पडणाऱ्या १३ जणांना नोटीस बजावली आहे. यापुढेही अशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. उच्चतम दर्जाची उपचार प्रणालीचा अवलंब केला जात आहे. आज अखेर करोनाचे १२ रूग्ण असून १३७ रूग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर, १ हजार ११६ लोकांना १४ दिवसांसाठी “होम इन क्वारंटाईन”च्या सूचना दिल्या आहेत. अशा सूचना असुनही घराबाहेर पडणाऱ्या १३ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. यापुढे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.





