Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना एप्रिलच्या हप्त्याची तारीख किती?

Ladki Bahin Yojana | महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेली ही योजना २१ ते ६० वयोगटातील महिलांना १५०० मासिक आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसाव्यात, तसेच योजना अंतर्गत सामाजिक व आर्थिक निकष पूर्ण केलेले असावेत.
सरकारने अद्याप नेमकी तारीख जाहीर केलेली नसली, तरी महिला व बाल विकास विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना एप्रिल २५ ते एप्रिल ३० या कालावधीत हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : महिला आयोग आपल्या दारी, पुण्यात तीन दिवसात ३०५ तक्रारींची जनसुनावणी
पात्र महिलांना १५०० इतकी आर्थिक मदत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. खास करुन हा दिवस अक्षय्यतृतीयेचा असू शकतो. लाभार्थ्यांनी बँक खाते आणि अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे तसेच एसएमएस अलर्ट्सद्वारे माहिती तपासावी.