विधानसभेला मी इच्छुक नाही, माजी आमदार विलास लांडेची इच्छुकांपुढे गुगली
- साहेबांपुढे … ज्येष्ठ पदाधिका-यांनी वाचला तक्रारीचा पाढा
- पक्ष पदाधिका-यांनी एकमेकांना पाजले डोस
- वैयक्तीक स्वार्थापोटी पक्षाला लागली घरघर
पिंपरी ( महा ई न्यूज ) – राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता असताना पक्षवाढीसाठी कोणी काम केलेच नाही. पदे घेतलेल्या नेत्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला संवाद तुटला आहे. पदाधिका-यांनी लोकांमध्ये उतरुन काम करायला हवे, परंतू, वरवरचे काम करुन पक्षाला नेत्यांनीच घरघर लावली आहे. पक्ष संघटनेला महत्व न देता, वैयक्तिक स्वार्थ पाहिल्याने आज पिंपरी चिंचवडमध्ये कामे करुनही अशी अवस्था झाली आहे, अशी भावना अनेक आजी-माजी पक्ष पदाधिका-यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार यांच्यासमोर बोलून दाखविली.
दरम्यान, अनेकांनी आगामी विधानसभेला भाकरी फिरवा, नवख्या चेह-यांना संधी देण्याच्या सुचना मांडल्या. त्यावर माजी आमदार विलास लांडे यांनी मी भोसरी विधानसभेला अजिबात इच्छुक नाही, कोणाला तिकीट द्यायचे त्यांना द्या, असे सांगत इच्छुकांमध्ये गुगली टाकली आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, बरं वाटलं विलासराव, मी पण इच्छुक नाही, असं सांगणारे फार क्वचित आढळतात. मीही तुमच्याकडून प्रेरणा घेवून इच्छुक नाही, असे सांगताच सभागृहात एक हशा पिकला.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची होणारी पडझडीमुळे पक्ष संघटन वाढविण्यासाठी स्वताः शरद पवार यांनी कंबर कसली आहे. तसेच मावळ लोकसभेतील झालेला पराभवाचे आत्मचिंतन आणि पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा निवडणुकीचा आढावा शरद पवार यांनी घेतला. यावेळी पक्षाच्या अनेक आजी-माजी पदाधिका-यांनी त्रुटी, अडीअडचणी, गा-हाणे मांडले.
यावेळी काही पदाधिका-यांनी पक्षाच्या आंदोलन अनेक पदाधिकारी उपस्थित राहत नाहीत. परंतू, साहेब तुम्ही व अजितदादा शहरात आले की सगळे धावून पुढे-मागे करीत असतात. पक्षाला, संघटनेला महत्त्व द्यायला हवे, पक्षात प्रोटोकॉल पाळला जात नाही. दुस-याचा आदर बाळगायला हवी. आपल्या पक्षाची विचारधारा सर्वापर्यंत पोहचवून लोकांमध्ये उतरुन काम करायला हवे. खासदार, आमदार चांगले काम करायला हवे. तसेच अनेकांच्या मनात ईव्हीएम बाबत संमभ्र निर्माण झालेला आहे. अशा भावना व्यक्त केल्या.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, साहेबांना भेटायला गेल्यावर, ते म्हणाले लोकसभेला भोसरीत मनासारखे काम झाले नाही. त्यावर साहेबांना 2009 पासून आजच्या मताची आकडेवारी व्यवस्थित पटवून सांगितली. आता 37 हजारानी मागे आहोत. थोडा फरक कमी झाला आहे. परंतू, ही सगळे मते त्यांची नाहीत. एवढी मते इकडंची तिकडे होवू शकतात. प्रामाणिक कामं केली म्हणून आता अडचण येणार नाही. योग्य नियोजन केलं, तर तिन्ही विधानसभेत आपला विजय होवु शकतो. आमच्या कोणतेही मतभेत नाहीत, पराभवामुळे आम्हाला ठेचा लागल्या आहेत. विधानसभेला मी अजिबात इच्छुक नाही, कोणाला पण तिकीट द्या, त्यांचे प्रामाणिक काम करुन विजयी करु, असे सांगत ते म्हणाले, भाजपमध्ये मला पण तिकीट मिळाले असते, पण मी गेलेलो नाही. मला पक्ष बदलायला आवड नाही. कारण, माझी विचारधारा, निष्ठा, नेता हे पवार साहेब आहेत, असेही ते म्हणाले.