साहेब… भाकरी फिरवा, तेच तेच चेहरे विधानसभेला नको, कार्यकर्त्यांच्या भावना

- पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेचा घेतला आढावा
- पक्ष संघटन हवं, नवीन चेह-यांना संधी द्या
पिंपरी ( महा ई न्यूज ) – साहेब… विधानसभा निवडणुकीत भाकरी फिरवा, जूने तेच तेच चेहरे देवू नका, नवख्या अचुक चेह-यांना निवडणुकीत उतरवून पक्ष बळकट करायला हवा. तसेच नात्या गोत्यांच्या राजकारणाचा पक्षाला फटका बसू लागलाय, स्थानिक गाव वाल्यांनी बाहेरुन येवून प्रस्थापित झालेल्यांना सोबत घ्यायला हवं. अशा सुचना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार यांच्यापुढे कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, वसंतनाना लोंढे, अजित गव्हाणे, मयुर कलाटे, यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसला पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना भावना शरद पवार यांनी जाणून घेतल्या.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपआपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की , राष्ट्रवादीला गटबाजीचा फटका बसत आहे. पक्षाने बेरजेचे राजकारण करायला हवं. दलित समाजात काॅग्रेस राष्ट्रवादी प्रचंड नाराजी ती दूर करायला हवी. पदाधिका-यांनी नाती गोती बाजुला ठेवुन पक्षासाठी काम करावे, पक्षात सर्वाना समान संधी द्यावी,





