Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएममध्ये 54 हजार रुग्णांना मिळणार हेल्थकार्ड

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांसाठी हेल्थकार्ड मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे तब्बल 54 हजार हेल्थकार्ड पुरवठा करण्यासाठी 8 लाख 10 हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. रुग्णांसाठी 18 ऑगस्टपर्यंत हेल्थकार्ड वाटप सुरू राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हेल्थ कार्ड मॅनेजमेंट सिस्टिम राबविण्यात येत आहे. 19 फेब्रुवारी अखेर 20 हजार हेल्थ कार्ड वाटप करण्यात आली. मात्र, ठेकेदार मे. अमृता टेक्रॉलॉजी यांची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यावर रुग्णांना दररोज 300 कार्डप्रमाणे 18 ऑगस्टपर्यंत 54 हजार हेल्थ कार्ड वाटप केली जाणार आहेत. त्यासाठी 15 रुपये प्रती कार्डप्रमाणे एकूण 8 लाख 10 हजार रुपये एवढा खर्च येत आहे. या खर्चाला मंजुरी घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा ठराव बुधवारी (दि. 13) स्थायी समितीपुढे ठेवला. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button