Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

रहाटणीत चोरट्यांनी केला सराफावर गोळीबार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लूटमारीसाठी आलेल्या चार चोरट्यांनी सराफावर गोळीबार करत सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले. ही रहाटणीतील कोकणे चौक परिसरातील पुणेकर ज्वेलर्स येथे घडली.

दिव्यांग प्रदीप मेहता  (वय २४ रा. रहाटणी) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास चार चोरटे दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर आतून लावून घेतले. आतमध्ये असलेल्या दिव्यांग यांच्या पायावर गोळी मारत दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button