breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादीची प्रतिष्ठा ‘पनाला’

  • खासदार बारणे यांचा मार्ग बनला किचकट
  • भाजप कार्यकर्त्यांकडून कायम धोक्याचा इशारा

– अमोल शित्रे 


पिंपरी – मावळ मतदार संघामध्ये सर्वाधीक मतदारांची संख्या ही पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये आहे. मावळ मतदार संघातील 19 लाख मतदारांपैकी 10 लाख 76 हजार मतदार केवळ कोकण पट्ट्यात विभागले गेले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदार संघापेक्षा या तीन विधानसभा मतदार संघांवर सर्वाधिक लक्ष असते. त्यातच यातील सहा विधानसभा मतदार संघातील पाच विधानसभा युतीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे युतीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक फायदेशीर वाटत असली तरी राष्ट्रवादीसाठी ती प्रतिष्ठेची बनली आहे.

फेब्रुवारी 2008 रोजी राज्यात मावळ एक नवीन लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आला. कोकण पट्ट्यातील पनवेल, कर्जत, उरण आणि घाटावरील मावळ, पिंपरी आणि चिंचवड या सहा विधानसभा मतदार संघाचा त्यात समावेश आहे. ज्यावेळी हा मतदार संघ अस्तित्वात आला तेव्हापासून याठिकाणी शिवसेनेचे प्राबल्य कायम राहिले आहे. शिवसेनेचे गजानन बाबर हे मतदार संघाचे पहिले खासदार राहिले आहेत. त्यानंतर श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत. आता आगामी निवडणुकीत शिवसेनेची हॅट्रीक होण्याची शक्यता आहे. श्रीरंग बारणे यांनाच सेनेची उमेदवारी मिळण्याचे निश्चित मानले जात आहे. तरी, बारणे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत खडतर मानली जात आहे.

  • बारणे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीचे पार्थ पवार मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारीही घोषीत केली आहे. अता ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. पार्थ यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बारणे यांच्या विरोधात एकवटले आहे. तर, त्यांच्या विरोधात शिवसेनेने मावळ गोळीबाराचे फोटे सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे जुन्या-नवीन मुद्यांवरून शिवसेना-राष्ट्रवादीत वाकयुध्द होणार आहे.

कर्जत विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. तर, पनवेल आणि उरण विधानसभा अनुक्रमे भाजप आणि शिवसेनेकडे आहे. मावळ आणि चिंचवड विधानसभा भाजपकडे तर पिंपरी विधानसभा शिवसेनेकडे आहे. या मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघ युतीच्या ताब्यात आहेत. तरी, पनवेल आणि कर्जतमध्ये शेकापचा पगडा कायम आहे. तर, मावळ विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप अशी आघाडीची वज्रमुठ आहे. पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघांवर युतीचे आमदार असले तरी तळागाळातील कार्यकर्त्यांची नाळ राष्ट्रवादीशी जुळलेली आहे. कारण, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पंधरा वर्षे गाजवलेल्या सत्तेची समिकरणे तळागाळात रुजलेली आहेत. याठिकाणी पार्थ पवार यांच्यासाठी अवघड असे काही मानले जात नाही.


शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतभेद कायम

मावळ लोकसभा मतदार संघ भाजपला सोडावा अशी मागणी पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या सुमारे 50 नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. कारण, स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात मतभेद आहेत. युतीमुळे त्यांच्यातील मतभेद दूर झाले असले तरी मनभेद जुळवून ते युतीचे काम करतील असे सध्याचे वातावरण दिसत नाही. याउलट परिस्थिती पनवेल आणि उरण मतदार संघात आहे. शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळे तेथील कार्यकर्ते बारणे यांचे नेतृत्व मान्य करतीलच असे नाही. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची दाट शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button