पिंपरी / चिंचवड

महामानवाला पालिकेचे अभिवादन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतितील त्यांच्या प्रतिमेस व पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत व पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन महापौर राहुल जाधव यांनी केले. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रभारी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पंजली अर्पण करून अभिवादन केले.

पिंपरी चौकात झालेल्या या कार्यक्रमात स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, बोदडे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, रविंद्र दुधेकर, वसंत साळवी, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, संतोष जोगदंड, मनोज गडबडे, संजीवनी पांडे, महिती व जनसंपर्कचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button