महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयातील डाॅक्टरचा तडकाफडकी राजीनामा
वायसीएमच्या स्त्रीरोग तज्ञ डाॅक्टर आयुक्तांकडे सोपविला राजीनामा
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील स्त्री रोग विभागातील एका डाॅक्टर आज (शुक्रवारी) तडकाफडकी राजीनामा दिला. आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपविला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित तीन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरात अजूनही तीन रुग्ण संशयित म्हणून सापडले आहेत. त्यातच वायसीएम रुग्णालयात डाॅक्टराची अपुरी संख्या असताना गायनॅक विभागातील डाॅ. प्रसाद भानप यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देताना महापालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच डाॅक्टरांची कायमस्वरुपी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्या भरती प्रक्रियेत राजीनामा दिलेल्या डाॅक्टरची निवड झालेली नाही. वायसीएम रुग्णालयातील गायनॅक विभागात ते काम करुनही त्यांना डावलल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.





