Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेतल्याने सत्तारुढ पक्षनेते पदाचा राजीनामा

तीन वर्षात ‘सत्तारुढ पक्षनेते’ पद बनले शोभेचे बाहुले; विरोधकांना अंगावर घेण्यासाठी कारभा-याकडून दुरुपयोग

पिंपरी |महाईन्यूज| प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज (सोमवारी) आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. महापाैर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे सायंकाळी 5 वाजता राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, महापालिकेच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सत्तारुढ पक्षनेत्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. गेल्या तीन वर्षात केवळ विरोधकांना अंगावर घेवून त्याच्या टीकेला उत्तर देण्यापलिकडे पक्षनेत्यांनी कोणतीची भूमिका निभावली नाही. त्यामुळेच ‘त्या’ पदाचा कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अचानक तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्याचे भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना पुसटची देखील कल्पना नव्हती. महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर शहराध्यक्षांना त्याची माहिती पवार यांनी दिली.

महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मधील झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होवून भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षाचा एकनिष्ठ असणा-या एकनाथ पवार यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली. तब्बल तीन वर्षांचा कार्यकाळ त्यांना लाभला. मागील काही काळात महापाैर, उपमहापाैर बदलानंतर सत्तारुढ पक्षनेते पदी देखील बदलाची चर्चा झाल्या. पण, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यस्तरीय नेत्यांच्या असलेल्या विश्वासामुळे एकनाथ पवार यांचा राजीनामा घेतला नाही. त्यांचे सभागृह नेतेपद कायम अबाधित राहिले. परंतू, त्यांनी आज तडकाफडकी राजीनामा देण्याची घोषणा केली. यापुर्वी पवार यांनी भाजपचे शहराध्यक्षपद देखील भूषविले आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेत यापुर्वी भाजपचे अवघे तीन नगरसेवक होते. 2014 मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर फेब्रुवारी 2017 ला महापालिकेत सत्तांतर झाले. त्यानंतर सभागृह नेते पदी एकनाथ पवार यांची वर्णी लागली. परंतू, गेल्या तीन वर्षात पालिकेच्या निर्णय प्रक्रियेत सत्ताधारी कारभा-यांनी त्यांना कधी विश्वासात घेतले नाहीच. त्या कारभा-यांनी घेतलेल्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यापलिकडे त्यांना काही करुच दिले नाही. त्यामुळे सभागृह नेता असूनही पालिकेत पवार हे कायम निर्णय प्रक्रियेतून बाहेर राहिले. तसेच स्थायी समितीच्या आर्थिक विषयात देखील त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे सत्तारुढ पक्षनेते पद हे शोभेचे बाहूले बनले होते. शिवाय विरोधकांनी पक्षावर, सत्ताधारी कारभा-यांवर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देण्याचे एकमेव काम एकनाथ पवार यांनी तीन वर्ष निभावले आहे. यामुळेच उदिग्न होवून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळा सुरु आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button