Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिका प्रशासनातील रिक्त जागा त्वरीत भरा

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी
  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले निवेदन

पिंपरी – वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यास दिरंगाई होऊ नये, यासाठी महापालिकेच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात साने यांनी आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नागरिकांना वेळेवर नागरी सुविधा मिळत नाहीत. त्यातच पालिकेच्या प्रशासकीय सेवेतील असंख्य अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच, अनेक कर्मचा-यांनी स्वेच्छा निवृत्ती देखील घेतली आहे. त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होऊ लागला आहे. कर्मचा-यांअभावी नागरिकांना सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

सेवानिवृत्त अथवा स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागा अद्याप भरलेल्या नाहीत. आरोग्य, विद्युत, पाणी पुरवठा, ड्रेनेज, उद्यान, स्थापत्य, बांधकाम परवानगी, नगररचना, पर्यावरण, प्रधानमंत्री आवास योजना, स्थापत्य झोनिपू, करसंकलन विभाग अभियांत्रिकी अभिनामाच्या व आरोग्य कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजात दप्तरदिरंगाई होत आहे. विकास कामांत अडचणी निर्माण होत आहेत. आरोग्य, स्थापत्य विषयक कामांमध्ये गतिमानता येण्यासाठी अभियंता, आरोग्य अधिकारी व इतर संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिध्द करून या जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी साने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button