मतदार नोंदणीमध्ये जास्तीत-जास्त पदवीधरांनी सहभागी व्हावे : आमदार महेश लांडगे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/dada.jpg)
भारतीय जनता पार्टी पिपंरी चिचंवड शहर ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान’
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चा आणि आमदार महेशदादा लांडगे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली कुदळवाडी परिसरात ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियाना’चा प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानात जास्तीत जास्त युवा पदवीधारकांनी नाव नोंदविण्याचे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
यावेळी सरचिटणीस अमोल थोरात, राजु दुर्गे, विजय फुगे, महादेव कवितके, नगरसेवक वंसत बोराटे, आश्विनी जाधव, पांडुरंग भालेकर, संतोष जाधव, युवराज पवार, नितीन मोरे, काका शेळके, विजयराज यादव, गणेश यादव, उत्तम बालघरे, मनोज मोरे, शशिकांत पुंड, कुदन गुप्ता, किशोर लोंढे, मोईद शेख, सोमनाथ यादव, राजेश डोंगरे, रामदास कुटे, दत्ता जरे, रामकृष्ण लांडगे, सुशांत कुलकर्णी, कुंडलिक मोरे, विलास यादव,दत्तात्रय मोरे,ईस्माईल मुजावर हे उपस्थित होते
नाव नोंदणी अर्जासोबत एक फोटो, आधारकार्डची झेरॉक्स आणि पदवी, पदविका प्रमाणपत्राची झेरॉक्स जमा करायची आहे. काही अर्जदारांना अद्याप प्रमाणपत्र मिळालं नसल्यास त्यांच्या पदवी वर्षाच्या मार्कशीटची झेरॉक्सही चालू शकेल. तसेच विवाहित महिलांसाठी विवाह नावनोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे, अशी माहिती दिनेश यादव यांनी दिली.
पदवीधर मतदानाची संख्या वाढावी यासाठी मुळात पदवीधर मतदार वाढणं आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने पदवीधरांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी सांगितले.