Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सीमाभागातील मराठी बंधु-भगिनीवर होणाऱ्या दडपशाहीचा निषेध: ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर

१ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन

मुंबई । प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पत्रकारांचे योगदान मोठे आहे. याचे भान व जाण आम्हाला आहे आणि म्हणूनच  सीमा भागातील मराठी माध्यमकर्मीं,बंधु भगिनींसोबत आपण आहोत. यासाठी प्रकर्षाने व्यक्त होणे अत्यावश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांनी व्यक्त केले.

करदेकर म्हणाल्या की,  महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्याआधी आम्ही बेळगाव दौरा केला होता. तेव्हाच,येणारे सरकार बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र नक्कीच करेल हा विश्वास व्यक्त केला होता.आणि तोच विश्वास आजही आहे. सीमाभागातील  मराठी माध्यमकर्मींना महाराष्ट्र सरकारने त्यांचा सन्मान व हक्क द्यावेत अशी मागणीही केली आहे.

मराठी बंधु-भगिनीवर जी दडपशाही होते त्याचा निषेध करावा तितका कमी आहे.आणि म्हणूनच आपण त्यांचेसोबत असणे आवश्यक आहे.  १ नोव्हेंबर रोजी आपणही काळ्या फिती बांधून सीमाभागातील दडपशाहीचा निषेध करुयात, असे आवाहनही करदेकर यांनी केले आहे.

माध्यमकर्मींनीही काळा दिवस पाळावा…

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून  बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर ला काळा दिवस पाळला जातो. आपणही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या दडपशाहीचा निषेध करुया. महाराष्ट्रातील आपल्या पत्रकार बंधु भगिनींनी यात सहभागी व्हावे आणि आपला पाठिंबा द्यावा,तसेच वाँटस अप स्टेटसवर काळा रंग ठेवून ,तसेच समाज माध्यमातून पाठिंबा देऊया, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button