breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भोसरीत आयारामांना उमेदवारी देण्यास निष्ठावांनाचा विरोध; … तर भाजपचा जूना हुकमी एक्का कोण?

  • महायुतीत भोसरी विधानसभेवर शिवसेनेचा दावा
  • उमेदवारीवरुन भाजपच्या नव्या-जून्याच्या वादास सुरुवात

 विकास शिंदे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून आयारामांना संधी न देता निष्ठांवान व जून्या चेह-याला संधी द्यावी, याकरिता मुख्यमंत्री व प्रदेशध्यक्षांना लवकरच जून्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते साकडे घालण्यास जाणार आहेत. त्यामुळे भाजपचे सहयोगी सदस्य व अपक्ष विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारी भाजपच्या जून्या गटाकडून विरोध दर्शविण्यास सुरुवात झाली आहे.अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

भोसरी येथे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ते व प्रमुख पदाधिका-यांची नुकतीच बैठक पार पडली. त्यात आयारामांच्या उमेदवारीवरुन चर्चा होवून जून्या व निष्ठावांन कार्यकर्त्यांना ताकद देण्यास एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशामुळे इच्छुकांना आमदारकीची स्वप्न पडू लागले आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपने समाविष्ट गावांना न्याय देत दोन्ही वेळेस महापौर पद, सभागृह नेता, दोनदा स्थायी समिती सभापती, विविध समित्या व क्षेत्रीय सभापती अशा महानगरपालिकेतील महत्वाच्या पदांवर अनेकांना संधी दिली. भोसरी विधानसभेत पक्षाची ताकद चांगलीच वाढली आहे. पक्षसंघटनेत कार्यकर्त्यांची चांगली फळी तयार होवून पक्ष संघटन मजबूत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेनेच्या उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना 38 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीय केले आहे.

भोसरी मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला आहे. मतदारसंघाच पुर्नरचनेनंतर मतदारांनी अपक्षांच्या बाजूने कौल दिला आहे. पहिल्यांदा आमदार म्हणून विलास लांडे त्यानंतर विद्यमान आमदार महेश लांडगे हे राहिले आहेत. आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित आघाडीतून इच्छुकांनी निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून रणागंणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील जून्या निष्ठावांन कार्यकर्ते व पदाधिका-यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेतली. त्या बैठकीत भाजप सहयोगी सदस्य व विद्यमान अपक्ष आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यास अनेकांनी विरोध दर्शविला आहे. तसेच आयारामांना संधी देवून निष्ठावांन कार्यकर्त्यांनी किती दिवस सतरंज्या उचलायच्या असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. भाजपच्या जून्या पदाधिका-यांनी व विविध हिंदुत्ववादी संघटनाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बैठकीत हा एकमुखी निर्णय घेतला आहे.

यामध्ये भोसरी विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून जून्या चेह-यांपैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, आम्ही त्यांचे प्रामाणिक व निष्ठेने काम करुन विजयश्री खेचून आणू. असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत भोसरीतील कार्यकर्ते व पदाधिकारी मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्षांकडे आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.

तसेच भाजपचे दोनशे ते अडीशे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र येवून यापुढे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करणार आहेत. भाजपकडून जून्या चेह-याला उमेदवारी मिळेल, याकरिता संघर्ष करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्ते व पदाधिका-यांनी कामाच्या जबाबदारी वाटून घेण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सुसूत्रता आणण्यासाठी हे कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले आहेत. अशी माहिती विश्वसनीय सुत्रानं दिली.

…. युतीमुळे भोसरी विधानसभेवर शिवसेनेचा दावा   

राज्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार आहे. युतीमुळे भोसरी विधानसभेवर शिवसेनेचा दावा कायम राहणार आहे. शिवसेनेकडून उमेदवार म्हणून इरफान सय्यद, सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्या नावाची चर्चा असून 44 हजार मते हक्काची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भोसरीचे अपक्ष आमदार व भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे यांनी मागील दोन वर्षापासून भाजपकडून उमेदवारी मिळावी, याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच भाजपकडून जून्या चेह-यापैकी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजप युवा मोर्चाचे रवी लांडगे, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या महायुतीत भोसरी विधानसभेसाठी उमेदवारी कोणाचा गळ्यात पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.     

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button