Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व दिमाखात साजरा होणार

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व साजरा करण्याच्या अनुषंगाने भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शहरातील सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची शनिवारी भेट घेतली. विचार प्रबोधन पर्वच्या नियोजनाबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने बैठक घ्यावी आणि निधीमध्ये वाढ करावी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात दिमाखात साजरी करण्यात यावी, त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेने कुठेही कमी पडू नये, अशा मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या. आयुक्तांनी सकल मातंग समाज शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या या भेटीत मान्य केल्याने यंदाचा जयंती उत्सव सोहळा दिमाखात साजरा होणार आहे.

हेही वाचा –  महायुती विधानसभेच्या किती जागा जिंकणार?; देवेंद्र फडणवीस यांनी आकडाच सांगितला

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत निगडीसह शहराच्या इतर भागात विविध समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२४ चे आयोजन केले जात असताना त्यासंदर्भात शहरातील सकल मातंग समाजाच्या वतीने काही मागण्या पुढे आल्या आहेत. त्यानुसार या समाजाच्या शिष्टमंडळाने भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन घोलप, माजी अध्यक्ष नाना कसबे, सुनील भिसे, संजय ससाणे, अरूण जोगदंड, बाळासाहेब पाटोळे, रामेश्वर बावणे, नाना कांबळे, मोहन भिसे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button