Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भोसरीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण आग; जीवितहानी नाही

पिंपरी |महाईन्यूज|
भोसरी एमआयडीसीतील गवळीमाता येथील एका केमिकल कंपनीत मोठी आग शनिवारी दुपारी एकच्या सुमारास लागली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका एमआयडीसी मिळून १३ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

त्यांच्या सहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दल व पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. या आगीत आत्तापर्यंत कोणीही जखमी नसल्याचे घटनास्थळी असलेल्या जवानांकडून सांगण्यात आले. मात्र, कंपनीत मोठा केमिकल साठा असल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. त्यामुळे अग्निशामक विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे.




