Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्र @ दावोस : एआय, इनोव्हेशन सिटी ते रायगड–पेण ग्रोथ कॉरिडॉर; आर्थिक प्रगतीला नवे बळ!

दावोसच्या व्यासपीठावरून महाराष्ट्राच्या भविष्याचा जागतिक आराखडा

दावोस | स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम 2026’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग नोंदवित महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक विकासाचा ठळक आराखडा जागतिक व्यासपीठावर मांडला. वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये भारतातील 10 राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रासाठी कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक करारांची घोषणा केली. उद्योग, सेवा, शेती, तंत्रज्ञान, एआय डेटा सेंटर, इनोव्हेशन सिटी तसेच रायगड–पेण ग्रोथ कॉरिडॉर अशा विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीमुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे. एकूण गुंतवणूक करारांपैकी सुमारे 83 टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) असून, 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा      :          मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा; ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याचे वक्तव्य 

मुंबई महानगर प्रदेशापुरतेच नव्हे तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील विविध भागांतही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्येही विकास प्रकल्प उभारले जाणार आहेत.

‘तिसऱ्या मुंबई’च्या संकल्पनेअंतर्गत टाटा सन्सच्या माध्यमातून इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. भविष्यसज्ज शहरांच्या दृष्टीने ही इनोव्हेशन सिटी महत्त्वाची ठरणार आहे. यासोबतच रायगड–पेण येथे ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार असून, बीकेसीच्या धर्तीवर एमएमआरडीए आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने व्यावसायिक केंद्र विकसित केले जाणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. यंदाचा दावोस दौरा महाराष्ट्रासाठी परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला असून, या गुंतवणुकीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या माध्यमातून महाराष्ट्राने जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आहे. एआय, इनोव्हेशन सिटी, ग्रोथ कॉरिडॉर आणि पायाभूत सुविधांच्या बळावर महाराष्ट्र देशातील नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेतील आघाडीचे राज्य म्हणून पुढे येईल.

– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button