“फ्लॅट”चा कोयंडा उचकटून रोख रक्कमेसह दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/theft-672x420.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून कपाटातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकूण सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी अकरा ते रात्री नऊच्या सुमारास काळेवाडीतील नढेनगर येथील भगवती टॉवर बी-विंग इमारतीमध्ये उघडकीस आली आहे.
याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २९ वर्षीय महिला या काळेवाडीतील नढेनगर येथील भगवती टॉवर बी-विंग या इमारतीच्या फ्लॅट नं.२ मध्ये राहतात. शनिवारी त्या त्यांच्या फ्लॅटला कुलुप लावून बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, चोरट्यांनी घराचे कडी-कोयंडा उचकटून घरातील कपाटात ठेवलेले ६६ हजारांचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १६ हजारांचा ऐवज चोरुन नेला. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.