Breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी नम्रता पाटील, विनायक ढाकणे यांची पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती

पिंपरी –  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि.२७) काढलेल्या आदेशान्वये भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील राज्यातील ९५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नम्रता पाटील यापूर्वी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) पदावर कार्यरत होत्या. तर विनायक ढाकणे पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर येथे कार्यरत होते. दोन्ही तडफदार पोलीस अधिकारी उपायुक्त म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळाले आहेत. या निवडीनंतर पोलीस आयुक्त म्हणून कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button