Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये 5 नवीन पोलिस निरीक्षकांची नियुक्ती, दोघांची अंतर्गत बदली

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड पोलिस दलात पाच नवीन पोलिस निरीक्षकांची नियुक्ती झाली असून दोन निरीक्षकांची अंतर्गत बदली झाली आहे. यासह महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)च्या आदेशाने सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांची बदली रद्द झाली असून त्यांच्याकडे पुन्हा वाकड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच पोलिस निरीक्षक सुनील टोनपे यांची पिंपरी ठाण्यातून वाकड ठाण्यात ( गुन्हे- २) तर रवींद्र जाधव यांची नियंत्रण कक्षातून दिघी- आळंदी वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, नव्याने दाखल झालेल्या पाच पोलिस निरीक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या. यामध्ये वनिता धुमाळ – आर्थिक गुन्हे शाखा, दशरथ वाघमोडे – म्हाळुंगे चौकी (गुन्हे), अनिल देवडे – चाकण (गुन्हे), भोजराज मिसाळ – पिंपरी (गुन्हे), सोन्याबापू देशमुख -देहूरोड (गुन्हे) यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button