पिंपरी – चिंचवडमध्ये 2 दिवस दुकाने बंद; व्यापारी महासंघाचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/13-6.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडमधील किराणा माल, औषधे आणि भाजीपाला वगळता इतर सर्व दुकाने उद्या बुधवारी (दि.18) आणि गुरुवारी (दि.19) बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ असोसिएशन या शिखर संघटनेने घेतला आहे. या बंदबाबत गुरुवारी फेर आढावा घेतला जाणार आहे.
करोना विषाणूच्या आपत्तीवर चर्चा करुन उद्योग-व्यवसाय आणि व्यापाराची पुढील दिशा ठरविण्याच्या उद्देशाने फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवड येथील हायवे टॉवर्स येथे व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविण्यात आली. त्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी श्याम मेघराजानी, सराफ असोसिएशनचे रमेश सोनिगरा, हॉटेल्स असोसिएशनचे पद्मनाभ शेट्टी, महेश मोटवानी, गंगाराम पटेल, अमोलिक दुगड, राजू चिंचवडे, सुरेश गादिया, गोविंद पानसरे आदी यावेळी उपस्थित होते.