Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील इंग्रजी शाळांकडून पालकांची लूट थांबवा

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे मागणी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहरातील काही खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून ट्यूशन, स्पोर्टस, ट्रॅव्हलींग, युनिफॉर्म, स्टेशनरी पुस्तके आदी विविध प्रकारचे शुल्क वसुल केले जात आहे. याबाबत पालकांच्या तक्रारी वाढल्या असून महापालिकेने संबंधित शाळांवर योग्य ती कारवाई करावी, अशा सुचना सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत. यावेळी नगरसेविका आरतीताई चोंधे, निर्मलाताई कुटे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह पालक उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ करू नये, तसेच शुल्क टप्प्या-टप्प्याने भरण्याचा पर्याय शाळांनी द्यावा, असे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय मनुष्यबळ विभागाने दिलेले आहेत. त्या आदेशाचे पिंपरी चिंचवडमधील शाळांकडून उल्लंघन होवू लागले आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावली आहे. शालेय व्यवस्थापनांकडून मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत सुमारे दिडपट शालेय शुल्क वाढविले आहे. सध्या कोरोनाच्या महामारीत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झालेला असुन शाळांकडुन न परवडणारे शुल्कबाबत तगादा लावला जात आहे. तसेच या कालावधीमध्ये शाळांकडुन सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षणासाठी देखील टॅब, लॅपटॉप, मोबाईल खरेदीचा खर्च पालकांनाच करावा लागणारा आहे. त्याचा वेळ सुध्दा पालकांनाच द्यावा लागणार आहे.

तसेच शाळांवर कुठल्याही खर्चाचा ताण नसतानाही शालेय शुल्कात भरमसाठ वाढ करणे, शुल्कबाबत वारंवार पालकांकडे तगादा लावणे, हे योग्य नसल्याचे उपस्थित पालकांनी व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले. यानूसार आयुक्तांनी लॉकडाऊन सुरू असेपर्यंत शालेय व्यवस्थापनाने शालेय शिक्षण शुल्काची मागणी करू नये, तसेच पालकांकडे वारंवार तगादा लावू नये, शालेय शुल्क टप्प्या-टप्प्यात स्विकारणेत यावे, संबंधित शालेय प्रशासनाला समज दिली जाईल. यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनस्तरावर देखील पत्रव्यवहार करुन याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असं आयुक्त हर्डिकर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button