Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार? शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही ओवैसी यांचा निषेध केला नाही

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नते तथा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, अंबादास दानवे यांचा मला फोन आला होता. ते आमच्या संपर्कात आहेत, कधीही काही होऊ शकतं.
आमच्या मागे गर्दी नाही तरी इथे इतके लोक कसे जमले. उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही ओवैसी यांचा निषेध केला नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.





