Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

पिंपरी |महाईन्यूज|

पवना धरणात एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ब्राम्हणोली येथील कॅम्प साईट येथे घडली. सौरभ मलिक (वय ३३ रा.(मूळ)स्विन ब्लॉक,जलव्हायु विहार,गौतम बुध्द नगर उत्तर प्रदेश सध्या राहणार- लोणावळा) या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ हा लोणावळा येथील कैवलधाम येथे योगाचे शिक्षण घेत होता.

सौरभ व त्याचे तीन मित्र शनिवारी रात्री पवना धरण परिसरातील टेंट कॅम्पिंगवर फिरण्यासाठी आले होते. रात्री कॅंम्पिंगवर मुक्काम केल्यावर सकाळी ब्राम्हणोली येथील अनाधिकृत पार्किंगवर गाड्या उभ्या करून पवना धरणाच्या पाण्याकडे गेले व पवना धरणात पोहण्यासाठी उतरले त्यामध्ये सौरभला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. बाकीचे तीन मित्र पोहून बाहेर आले. त्यानंतर मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी त्याला पाण्याबाहेर काढला व नंतर पवनानगर येथील ग्रामीण रूग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button