Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पदवीधर मतदार नोंदणी अभियानास पिंपरीमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी |महाईन्यूज|

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियानास मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन करून मतदार नोंदणीला सुरुवात झाली.

याविषयी बोलताना नगरसेवक वाघेरे म्हणाले, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागरी सुविधा केंद्र येथे पदवीधर मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमास सरचिटणीस गणेश ढाकणे, मंडळाध्यक्ष महेंद्र बावीस्कर, नितीन अमृतकर, कमल मलकानी, नेहुल कुदळे, गोपाळ मंडल, अनिल कारेकर उपस्थित होते.

दरम्यान, पुणे पदवीधरची निवडणूक जाहीर झाली आहे. 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे. तर, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button