Breaking-newsपिंपरी / चिंचवड

न्यू सिटी प्राईडच्या विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे आयटीयन्सना शिकविले प्लास्टिक निर्मुलनाचे धडे

 पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एजुकेशन फाऊंडेशन  संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पिपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रपिता महात्मा गांधी” व महान स्वातंत्र सेनानी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त “प्लास्टिक निर्मूलन पर्यावरण रॅली” काढण्यात आली.

यावेळी स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. “प्लास्टिक निर्मूलन पर्यावरण रॅली”   शाळेपासून शिवार चौक आणि तेथून पुन्हा शाळेपर्यंत काढण्यात आली. यावेळी शिवार चौकात “मारू इकोबॅग्स” यांच्या वतीने प्लास्टिक बॅग्स व थर्मोकोल यांच्या उपयोगाने पर्यावरणाला होणारे नुकसान व आपल्या शरीराला होणाऱ्या हानीबदल जनजागृती केली.

कापडी पिशवी व पेपर बॅग्स यांच्या फायद्यांबदल माहिती सांगण्यात आले. कापडी पिशवी व पेपर बॅग्स यांचा वापर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, विकास पाटील, क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, सह. आरोग्य अधिकारी व्ही. के. बेंडाळे, आर. न. सौंदाई , पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव व मधुसुदन मारू उपस्थित होते. यावेळी  संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार आणि मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शाळेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनुराग सरानी यांनी मानले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button