नियमांचे उल्लंघन करणा-या 156 जणांवर पोलिसांचा दंडका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/3PunePolice.jpeg)
पिंपरी / महाईन्यूज
कोरोनाची साथ अजूनही संपली नसल्याने खबरदारीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शनिवारी (दि. 7) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 156 नागरिकांवर कारवाई केली आहे.
शहरामध्ये कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. शनिवारी 95 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही आकडेवारी मागील काही आठवड्यांपूर्वी 800 ते 1000 एवढी होती. कोरोना बाधित नागरिकांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना साथ पूर्णपणे संपलेली नाही. जरासा हलगर्जीपणा कोरोनाला निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून थेट भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले जात आहेत. शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या 156 नागरिकांवर खटले दाखल केले आहेत.
एमआयडीसी भोसरी (14), भोसरी (1), पिंपरी (0), चिंचवड (0), निगडी (0), आळंदी (13), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (31), सांगवी (55), वाकड (10), हिंजवडी (0), देहूरोड (5), तळेगाव दाभाडे (3), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (11), रावेत चौकी (11), शिरगाव चौकी (0)