TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

देशात काँग्रेस 150 जागांवर विजयी होईल, संजय राऊत यांना विश्वास

इंडिया आघाडी झपाट्याने पुढे जात आहे; नरेंद्र मोदींचा निरोप समारंभासाठी आकडेवारी पुरेसी

मुंबईः काँग्रेस पक्षाला 150 पेक्षा जागा मिळणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी मानेन, असे सूतोवाच संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी जिंकणार. ज्या ठिकाणी देशाचे पंतप्रधानच देशात पिछाडीवर आहेत, याचा अर्थ देशात परिवर्तन होत आहे. हेच या कलावरून स्पष्ट होतेय. उत्तरप्रदेशात मोदींविरोधात कल आहे. काँग्रेस 150 जागांवर जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

सध्या देशात जो कल दिसतोय नंदुरबारला काँग्रेसचा उमेदवार 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने पुढे आहेत. नाशिकमध्ये राजाबाऊ वाझे 80 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने पुढे आहेत. इंडिया आघाडी 295 पेक्षा जास्त जागा जिंकेल. दोन वाजेपर्यंत निकाल पूर्ण होईल.. सायंकाळी चार वाजेपर्यंत देशाचे चित्र स्पष्ट होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button